न्हावरे (अक्षय टेमगिरे) : करडे (ता. शिरुर) गावात जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाचा रस्ता अडवून शिवीगाळ करत चौघांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश ऊर्फ बाबू फुलफगर (वय २७ रा.निमोणे, ता.शिरुर) आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
करडे गावच्या हद्दीतील हॉटेल सागरसमोर मंगळवारी दि २१ जुलै २०२६ रोजी रात्री नऊ च्या सुमारास हि घटना घडली. रामदास महादेव आगलावे (वय २७,रा. करडे, ता. शिरुर) यांनी याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास आगलावे हे त्यांचा मित्र सुरज मांढरे याच्यासोबत मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता करडे येथील हॉटेल सागरमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास दोघेही करडे येथील घराकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी हॉटेल सागर समोर ऋषिकेश ऊर्फ बाबू फुलफगर आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी आगलावे यांच्या वाहनासमोर आपले वाहन आडवे लावून त्यांचा रस्ता अडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी आगलावे यांना शिवीगाळ केली. मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सोबत आणलेल्या काठ्यांनी मारहाण करत दुखापत केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलिस अंमलदार पवार हे करत आहेत.
दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…
शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…
Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…