क्राईम

शिरूर एसटी स्टॅण्डमध्ये आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह; पाहा वर्णन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बस स्टॅण्ड येथे अंदाजे ५०ते ६० वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह रविवारी (ता. १२) आढळला आहे. मयत व्यक्ती ची अदयाप ओळख पटलेली नाही. शिवाय, हत्या की आत्महत्या याचे गुढ अद्याप कायम आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील निंबा खेवजी लांडे यांनी शिरूर पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. शिरूर बसस्थानकात मृत्युमुखी पडलेली अनोळखी अज्ञात व्यक्ती अंदाजे वय 50 ते 60 वर्ष हे बेशुद्ध असताना त्यांना उपचारासाठी रविवारी ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे घेऊन गेले असताना डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाले असे सांगितले.

मयताचे वर्णन अंदाजे वय 50 ते 60 वर्ष वयोगट, रंग गोरा, डोक्याचे केस पांढरे, अंगात फुल बाहयाचे जर्किंग, पांढऱ्या रंगाचे फुल बाहयाचे शर्ट ज्यावर R/S टेलर मार्क खिशाजवळ असून, निळ्या रंगाची फुल पॅन्ट ,पांढऱ्या रंगाचा फुल बनियन ज्यावर राखाडी रंगात Hotline नाव असलेले, गळ्यात पांढऱ्या मण्याची माळ पांढरा धागा असलेली, उजव्या हाताचे मनगट पोटरीवर मराठीमध्ये रामनाथ नाव गोंदलेले व त्याच्यापुढे गोंदण खोडलेले आहे.

सदर व्यक्तीची माहिती मिळाल्यास पो.हवा .ए.एन आगलावे मो नं. 8208751516 व शिरूर पो स्टे सं.क्र. 02138-222139 यांना तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago