क्राईम

शिरूर तालुक्यात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती शेड फोडून लाखो रुपयांच्या कॉपर वायर लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगच्या शेडमधून तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांचा कॉपर वायरचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ रमेश शेलार (वय ४२) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दि. १६ मे २०२६ रोजी रात्री अंदाजे १:३० वाजण्याच्या सुमारास नागरगाव येथील “वेदांत इलेक्ट्रॉनिक अँड ट्रान्सफॉर्मिंग रिपेरिंग वर्क्स” या पत्र्याच्या शेडमध्ये हि चोरीची घटना घडली.

चार अज्ञात चोरट्यांनी शेडमधील ट्रान्सफॉर्मरचे पत्रे उचकुन आत प्रवेश केला आणि तेथे ठेवण्यात आलेल्या एल.व्ही. वाईंडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉपर तांब्याच्या तारा चोरी करुन नेल्या. चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे २२५ किलो वजनाच्या १५ गोलाकार कॉईल्सचा समावेश असून, प्रत्येक कॉईल सुमारे १५ किलो वजनाची आहे. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत अंदाजे २ लाख ४७ हजार रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपर वायर वाहून नेण्यासाठी वाहनाचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या परिसरात यापूर्वीही लोखंड, तांबे आणि इलेक्ट्रिकल साहित्य चोरीच्या घटना घडल्या असल्याने, या चोरीमागे भंगार माफिया किंवा सराईत टोळी सक्रिय असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कदम करीत आहेत. दरम्यान, नागरगाव परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. विशेषतः औद्योगिक साहित्य, ट्रान्सफॉर्मर आणि कॉपर वायर चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Video: शिरूर तालुक्यात अवैध हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरुर तालुक्यातील महिलेला चोराचा चेहरा पाहून बसला धक्का; लाखोंचे दागिने हस्तगत…

शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात आला वेग!

रामदास जगताप यांना लाच घेतला रंगेहात पकडले अन् झाली अटक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

12 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago