क्राईम

Video: शिरूर तालुक्यात अवैध हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

शिरूर (तेजस फडके) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शिरूर तालुक्यात मोठी धडक कारवाई करत निमगाव दुडे परिसरातील अवैध गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. घोडनदीच्या काठावरील झाडाझुडपांमध्ये सुरु असलेल्या या बेकायदा दारु निर्मिती केंद्रावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल २४ हजार लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारु आणि दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. या कारवाईत सुमारे १२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार संजू ज्ञानदेव जाधव (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आकाश रवि पवार (रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) आणि त्याचा साथीदार धोंडीभाऊ गावडे (रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास निमगाव दुडे येथील दुडेवाडी परिसरात, घोडनदीच्या पश्चिम किनाऱ्यालगत दत्ता दुडे यांच्या शेत जमिनीजवळील झुडपांमध्ये अवैध हातभट्टी सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता आरोपी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारु तयार करत असल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान पोलिसांना तीन मोठ्या लोखंडी चौकोनी टाक्यांमध्ये अंदाजे १५ हजार लिटर कच्चे रसायन, एका गोलाकार टाकीत ४ हजार लिटर रसायन तसेच जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात ताडपत्रीमध्ये साठवलेले सुमारे ५ हजार लिटर कच्चे रसायन आढळून आले. याशिवाय ७० लिटर तयार गावठी दारु, प्लास्टिक कॅन, चुली, लोखंडी पाइप, चाटू आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे ही दारु अत्यंत अस्वच्छ व धोकादायक पद्धतीने तयार केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी ही गावठी दारु विक्रीसाठी तयार ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरात विषारी दारुचा मोठा साठा तयार होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूरचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गावठी हातभट्टीचा काळाबाजार उघडकीस आल्याने या अवैध दारु व्यवसायाला नेमके कोणाचे संरक्षण आहे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात नदीकाठ, ओसाड शेतजमिनी आणि झाडाझुडपांचा आडोसा घेऊन सुरु असलेल्या या धंद्यांवर पोलिसांनी सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

रांजणगाव MIDC परिसरात बेकायदेशीर दारू वाहतुकीचा पर्दाफाश; दोन तरुणांना अटक 

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार व देशी दारू अड्यांवर LCB ची एकाच दिवशी मोठी कारवाई

दारू महागली म्हणून तरुण ब्रॅड बदलत लागले हातभट्टी दारूच्या नादी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago