cash

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली लाखो रुपयांची रक्कम शिरूर मधील एका बँक खात्यात जमा होत असल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. देशाच्या विविध भागातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये भरघोस नफा, आकर्षक नोकरीची ऑफर, गुंतवणुकीवर मोठा परतावा किंवा पोलिसांच्या नावाने भीती दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या बँक खात्याचा माग काढत शिरूर पोलिसांनी एस बँक शाखेतील अज्ञात खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सायबर पोर्टलवरील तक्रारींचे कामकाज पाहणारे पोलीस शिपाई सोनू मुरलीधर तावरे यांनी सायबर पोर्टलवर प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींची बारकाईने छाननी केली. या तपासादरम्यान देशभरातील नागरिकांना विविध आमिषे दाखवून किंवा भीती निर्माण करून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

त्यानंतर आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत असताना फसवणुकीतून मिळालेली रक्कम एका विशिष्ट बँक खात्यात जमा होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित खात्याची सखोल चौकशी करण्यात आली असता ते खाते शिरूर शहरातील एस बँकेच्या शाखेत असल्याचे उघड झाले. पुढील तपासात १९ जुलैपूर्वी या खात्यावर लाखो रुपयांची रक्कम जमा झाल्याचे तसेच त्या खात्याशी संबंधित सात स्वतंत्र सायबर तक्रारी नोंद झाल्याचे समोर आले.

सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम या खात्यात जमा करून त्यानंतर एटीएम किंवा धनादेशाच्या माध्यमातून ती रक्कम काढून घेत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामुळे हे खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जात असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई सोनू मुरलीधर तावरे (वय ३०, रा. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात एस बँक शाखेतील अज्ञात खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या खात्याद्वारे कार्यरत असलेल्या सायबर टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूरमध्ये एन.ए. प्लॉट घोटाळा उघड!  प्रांताधिकाऱ्यांचा प्लॉट विक्री व बांधकामाला स्थगिती आदेश

शिरुर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्याचा लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर! सुलभ भिशीच्या नावाखाली पोलीस व नागरिकांना तब्बल ३० कोटींचा गंडा?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत