शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. दीपक बाळासाहेब ऊर्फ बाळू ढेरंगे (वय ३७, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वी दहा गुन्हे दाखल असून एका प्रकरणात मोक्कानुसारही कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घराचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास…
कोरेगाव भीमा येथील किरण पंडित ढेरंगे हे १८ जुलै २०२६ रोजी कुटुंबीयांसह घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
View this post on Instagram
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे धनंजय दत्तात्रय घोडके याला यापूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. मात्र, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी दीपक ढेरंगे हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता
गोपनीय माहितीच्या आधारे पुण्यात सापळा रचून फरार आरोपीच्या हालचालींवर शिक्रापूर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले होते.
दरम्यान दीपक ढेरंगे हा पुण्यात येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला पुण्यातून ताब्यात घेतले असुन, दीपक ढेरंगे याच्याविरुद्ध शिक्रापूरसह लोणीकंद, लोणी काळभोर, सिंहगड रोड, चंदननगर, संगमनेर आणि रांजणगाव पोलीस ठाण्यांत दरोडा, खंडणी, मारहाण, अपहरण तसेच शस्त्र कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्यासह पोलीस कर्मचारी रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचित आणि नागेश वाघमारे यांनी सहभाग घेतला ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडले असून पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करीत आहेत.
शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…
शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत
शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…
शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडी करून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद