न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना करडे गावच्या हद्दीत देशमुखवस्ती परिसरात बाभुळसर ते करडे अष्टविनायक महामार्गावर घडली. या प्रकरणी शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर उमाजी सरके (वय २८, व्यवसाय शेती, रा. न्हावरा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हि घटना दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मौजे करडे गावच्या हद्दीतील देशमुखवस्ती येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपी रोहन सुनील तांबे आणि ओमकार विपिन तांबे (दोघेही रा. पारगाव, शिंदेवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी एका गैरसमजातून फिर्यादीला अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे.
View this post on Instagram
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी रोहन तांबे याने मोटारसायकलवर असलेल्या लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर, उजव्या हाताच्या कोपराजवळ तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण करून दुखापत केली. याशिवाय, दोन्ही आरोपींनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करीत आहेत.
शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…
सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा
कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या