क्राईम

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात काळ्या पैशांच्या आणि बोगस सोन्या व्यवहारांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, “सोन्याची मोड देतो” असे आमिष दाखवत पुण्यातील सराफ व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या व्यवहारात आरोपीने 84 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याने व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी ओमकार अशोक अष्टेकर (वय 38, रा. करीश्मा सोसायटी, कर्वे रोड, कोथरूड, पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर प्रशांत बर्मेचा (रा. शांतीनगर, पुणे) याच्याविरोधात फसवणुक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:22 ते 11:27 या च्या दरम्यान शिरूर बायपास हद्दीतील वेंन हुसेन शोरुम समोर हा कोट्यवधींचा व्यवहार झाला. आरोपी प्रशांत बर्मेचा याने “सोन्याची मोड” उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास जिंकला. त्यानंतर कविता रमांकात पराळे आणि त्यांची मुलगी मधु रमांकात पराळे (रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) यांच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रुपयांची रोख रक्कम आरोपीकडे सुपूर्द करण्यात आली.

मात्र, आरोपीने सुरुवातीला केवळ 15 लाख 35 हजार रुपये परत करुन विश्वास टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि उर्वरित 84 लाख 65 हजार रुपये या रकमेच्या बदल्यात सोने दिले नाही. त्यामुळे हा संपुर्ण व्यवहार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार भरदिवसा, पुणे-नगर महामार्गालगत आणि मध्यस्थांच्या उपस्थितीत झाल्याने या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची दबक्या चर्चा सुरु झाली आहे.

“सोन्याची मोड”, रोख व्यवहार आणि बिनदिक्कत कोट्यवधींची देवाणघेवाण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या व्यवहारातील पैशांचा स्रोत, आरोपीचे इतर साथीदार आणि अशाच प्रकारे इतर व्यापाऱ्यांनाही गंडा घातला गेला आहे का? याचाही तपास आता पोलिस करत आहेत.

शिरूर परिसरात गेल्या काही महिन्यांत आर्थिक फसवणूक, बनावट गुंतवणूक आणि सोन्या-चांदीच्या व्यवहारांतून लाखो रुपयांचे घोटाळे उघडकीस येत असताना, या नव्या प्रकरणाने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. “जलद नफा” आणि “स्वस्त सोनं” यांच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अशा टोळ्यांचे फावते असल्याचे बोलले जात आहे. 15 मे 2026 रोजी सायंकाळी 5.54 वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करत आहेत. आता आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स आणि मध्यस्थांची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.

शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक

सराफ व्यावसायिकांनी सुरक्षितता बाळगावी; प्रमोद क्षिरसागर

शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

11 तास ago