सराफ व्यावसायिकांनी सुरक्षितता बाळगावी; प्रमोद क्षिरसागर

शिरूर तालुका

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये सराफ व्यावसायिकांची बैठक संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): सराफ व्यावसायिकांनी व्यवसाय करताना योग्य खबरदारी घेत दुकान परिसरासह व्यवसायमध्ये सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरक्षितता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे सराफ व्यावसायिकांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सराफ व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर बोलत होते. यावेळी सराफ असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, ज्ञानेश्वर शहाणे, प्रशांत शिंदे, महेंद्र वर्मा, मुकेश वर्मा, गणेश शेडूते, अतुल मोरे, गोटू तळेगावकर यांसह आदी उपस्थित होते

तर सराफ व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना सराफ व्यवसायिकांनी दुकानात तसेच समोरील परिसर दिसेल असे उत्तम दर्जेचे CCTV बसवावे, परिसरात शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत, सराफ व्यवसायिक सोने, दागिने अथवा रोख रक्कम बँकेत किंवा घरी घेऊन जात असल्यास दुकानातील अथवा कुटुंबातील एखादा व्यक्ती सोबत ठेवावा, संशयित व्यक्ती विना पावती सोने विक्रीस आल्यास पोलिसांना कळवावे यांसह आदी सूचना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सराफ व्यवसायीकांना दिल्या आहेत. यावेळी पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले.