crime
शिक्रापूर : शिक्रापूरमधील (ता. शिरूर) एका दुकानातील केसांचा गठ्ठाच चोरट्यांनी पळविला असून, या केसांची किंमत तब्बल ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे या चोरीची चर्चा रंगली असून, पोलिसांसह शिक्रापूरकरांची चांगलीच करमणूक होत आहे.
शिक्रापूर येथील चाकण चौकातील वैजनाथ जाधव हे आपले गुरुवारी (ता. १०) वेस्ट हेअर सप्लाय या दुकानाचे शटर लावून रात्री लवकर घरी गेले होते. त्यांच्या दुकानात ते केसांच्या बदल्यात भांडी देण्याचा व्यवसाय करतात. गेल्या १५ दिवसांत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात केस जमा झाले होते. त्यामुळे त्यांनी या सर्व केसांचा गठ्ठा बांधून दुकानातच ठेवला होता. शुक्रवारी (ता. ११) सकाळी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील सर्व भांडी अस्ताव्यस्त पडलेली व सर्व केस चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानाच्या मागील भिंतीची जाळी तोडून चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे त्यांना दिसले.
वैजनाथ सोमनाथ जाधव (वय ३३, रा. रासकर मळा, कासारी, ता. शिरूर) यांनी चोरीला गेलेल्या केसांचे बाजारमूल्य पाहिले. ते चक्क ५० हजारांपेक्षा जास्त भरल्याने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या चोरीचा तपास पोलिस हवालदार गणेश करपे करीत आहेत.
दरम्यान, शिरूर तालुक्यात गुन्हा मजेशीर घडला असून, तपास पण गंभीरच आहे. गुन्हा दाखल झाला असल्यामुळे पोलिसांना तपास करावा लागणार आहे.
पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…
निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल
शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …