क्राईम

शिरूर तालुक्यात लघूशंकेसाठी घराबाहेर पडणे पडले महागात…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे पाठोपाठ न्हावरा येथे एका दाम्पत्याला तीन अनोळखी चोरट्यांनी गंभीर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १ लाख ६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

लिलाबाई परशुराम नागवडे (वय 50, रा नागवडे वस्ती, न्हावरे, ता शिरूर) यांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, सोमवारी (ता. १२) पहाटे 02.30 वा सुमारास मौजे न्हावरा गावचे हद्दीत नागवडे वस्ती (न्हावरे, ता. शिरूर) येथे घरी झोपले असताना फिर्यादी यांची नंनद भामाबाई हि लघुशंकेसाठी घराबाहेर जावून परत आत येत असताना तिच्या मागे तिन अनोळखी चोर हे रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याचे उददेशाने घरात घुसले. त्यापैकी एकाने त्याचे हातातील कुऱ्हाडीचे उलट्या बाजुने परशुराम नागवडे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

फिर्यादी लिलाबाई परशुराम नागवडे यांनी कुऱ्हाड हिसकावल्यावर चोरट्याने जवळ पडलेल्या लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या डाव्या हातावर पाठीवर मारहाण करून त्यांना कानातील फुले व गळ्यातील मणीमंगळसुत्र ओढुन कानाला दुखापत केली. शिवाय, त्यांची ननंद भामाबाई हिचे गळ्यातील पोत ओढून गंभीर दुखापत करून पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील हे पाटील हे करत आहेत.

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

5 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

17 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

18 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago