body
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावच्या बसस्थानकाच्या मागील कट्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. ४) दुपारी साधारण दोन वाजता ही घटना उघडकीस आली.
कवठे येमाई गावचे पांडुरंग सुरेश भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयात ते असताना गावातील नागरिक निलेश ढोबळे यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, “बसस्थानकाच्या मागील कट्यावर एक अनोळखी व्यक्ती हालचाल न करता पडलेला आहे व त्याच्या अंगावर मुंग्या लागलेल्या आहेत.”
त्यानंतर घटनास्थळी ते आले असता, अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाचा अनोळखी पुरुष मृतावस्थेत पडलेला आढळून आला. त्यांनी तत्काळ माहिती टाकळी हाजी पोलिस दुरक्षेत्राला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह अँब्युलन्सद्वारे शिरूर ग्रामीण रुग्णालयात हलवला.
दरम्यान, या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा शरद वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे नर बिबट्या जेरबंद ; वनविभागाची कारवाई
तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त: शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पैश्यासाठी खून! शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद
त्या खुणामागचे गुढ उकलण्याचे शिरूर पोलिसांपुढे आव्हान
शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…