शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (ता. शिरुर) या गावामध्ये दोन अल्पवयीन बहिणी सरपण आणण्यासाठी गेल्या असताना एकाने त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
टाकळी हाजी येथील दोन बहिणी असलेल्या अल्पवयीन मुली सरपण आणण्यासाठी घराजवळील शेतात गेल्या होत्या. यावेळी गावातील गणेश गावडे याने सदर अल्पवयीन युवतींचा पाठलाग केला, त्यांनतर त्याने मुलींना पकडून मुलींच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. यावेळी मुलींनी आरडओरडा करत गणेश याला ढकलून देऊन घराकडे पळून जाऊ लागल्या. यावेळी ‘तुम्ही तुमच्या आई वडिलांना काही सांगितले तर तुम्हाला मारून टाकीन, आज माझ्या तावडीतून सुटल्या परत कशीतरी मला सापडल्यावर बघून घेतो,’ अशी धमकी दिली.
अल्पवयीन मुली घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहचल्या आणि घडलेला प्रकार त्यांनी आईला सांगितला. दरम्यान घडलेल्या घटनेबाबत मुलींच्या आईने शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी गणेश मारुती गावडे (वय ३०, रा. तामकरवाडी टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करत आहेत.
शिरुर तालुक्यात आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग
शिरुर तालुक्यात महिलेचा विनयभंग; युवकावर गुन्हे दाखल
शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…