क्राईम

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या झडती कारवाई मध्ये जप्त केलेले खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवही मध्ये व्यक्तींना व्याजाने पैसे दिले असल्याबाबतच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. विलास रंगनाथ चोरे यांच्या तक्रारी अर्जावरून घरामध्ये सापडलेल्या कागदपत्रामुळे सहाय्यक निबंधक कार्यालयातील दिपक यशवंत वराळ यांनी बेकायदेशीर सावकारी व्यवसाय केल्याचे निदर्शनात आल्याने शिरूर पोलिस स्टेशनला सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाने सादर केलेल्या खरेदीखत दस्तऐवज क्रमांक 329/2020 नुसार लिहून देणार विलास रंगनाथ चोरे व लिहुन घेणार-सुरेश रभाजी चोरे यांचे मुळ खरेदीखत व लाल रंगाची धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या खतावाणी नोंदवहीमध्ये अर्जदार यांचा मुलगा सतिश विलास चोरे यांना व्याजाने पैसे दिल्याबाबतची नोंद आहे. तसेच इतर व्यक्तींना व्याजाने पैसे दिल्याबाबतच्या नोंदी सदर खतावणीमध्ये आढळून आलेल्या आहे.

अर्जदार विलास रंगनाथ चोरे यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केलेल्या मुळ अर्जासोबतच्या कागदपत्रांवरुन तसेच घरझडतीवेळी मिळालेले दस्ताऐवज व नोंदवहीतील नोंदीवरून सुरेश रभाजी चोरे हे बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करीत आहेत असे दिसून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुहयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.

कोरेगाव भिमातील कंपनीची अठरा टक्क्यांची सावकारी

सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला लागतोय बेकायदेशीर सावकारीचा चांगलाच फास

शिक्रापूरात महिलेच्या फसवणूक व सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

ग्रामीण भागातील नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास

खळबळजनक; पुण्यात खासगी सावकाराने पैशासाठी पतीच्या समोरच केला पत्नीवर बलात्कार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

5 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago