शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राठोड, दत्ता कांदे व दत्ता कांदे याचे दाजी या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील सदर 14 वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना रोहित राठोड व दत्ता कांदे दोघे तिचा पाठलाग करत दमदाटी करत होते. एकदा दोघांनी मुलीचा फोटो काढून घेतला. त्यानंतर मुलीला भेटून तिचे फोटो दाखवत मोबाईल नंबर देऊन फोन कर नाहीतर तुझे फोटो कोणालाही दाखवू, अशी धमकी देत होते. त्यानंतर 5 एप्रिल रोजी दत्ता कांदे मुलीला अडवून तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले.

दरम्यान मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रोहित राठोड, दत्ता कांदे व दत्ता कांदे याचे दाजी तिघे रा. आनंदनगर सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.