मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील बारा दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार…? ‘रक्त घ्या पण पाणी द्या’ शेतकऱ्यांची मागणी

पाबळ (सुनिल जिते) कान्हूर-मेसाई, पाबळ, केंदुर, चिंचोली आदी गावांसह बारा गावांचा पाणीप्रश्नावर शेतकरी पुन्हा एकदा पेटला असुन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर नेत्यांना गावात फिरु देणार नसल्याचे सांगत आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी द्या अशी आक्रमक भुमिका बारा गावच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

 

कान्हूर मेसाई गावात बुधवार (दि २६) रोजी नवीन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. कान्हूर गावच्या सरपंच चंद्रभागा खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात झाली. गावातील अनेक प्रश्नावर यावेळी चर्चा झाली. गावातील अनेक युवकांनी ग्रामसभेत पाणीप्रश्न मांडला. तसेच कान्हूर, पाबळ, केंदूर, चिचोली तसेच इतर गावांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जर पाणी प्रश्नमार्गी लागला नाही. तर कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात फिरु देणार असे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले.

 

तसेच पाणी प्रश्नासाठी गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजकीय भुमिका बाजूला ठेऊन एकत्र येऊन काम करण्याचे ग्रामसभेत ठरले. आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी द्या, वेळप्रसंगी रक्त सांडू पण हक्काचं पाणी द्या अशीही विनंती ग्रामस्थांनी यावेळी केली.

 

विधानसभा निवडणुकीपुर्वी सर्व्हेक्षणाच काम पुर्ण करा…

नागपुर येथे झालेल्या बैठकीमध्ये बारा गावाच्या पाणीप्रश्नाबाबत सर्व्हेक्षणासाठी पत्र काढले होते. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते सर्व्हेक्षण पुर्ण करुन या कामाची पुढील वाटचालीस सुरुवात करावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. तसेच आमदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची रविवारी वेळ घेऊन १२ गावातुन १०० ते २०० दुचाकी घेऊन १२ गावातील ग्रामसभेचे पत्र देण्याचाही यावेळी एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये बारा दुष्काळी गावातील शेतीसाठी पाण्याचा विषय मांडुन त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती करणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

 

बारा गावच्या पाण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण…

कान्हूर मेसाई येथे ग्रामसभा घेवुन शासनाच्या सर्व्हेबद्दलच्या भुमिकेवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अगामी काळात सर्व्हेचे काम वेगवान व्हावे. यासाठी पुन्हा पत्रव्यवहार करुन येत्या आठ दिवसात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपुर्ण गावातील आठ वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतचे युवा आणि जेष्ठ नागरिक या सर्वांनी एकदिवसीय उपोषण करण्याचे ठरवले आहे. त्याच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करुन शासनाला “रक्त घ्या पण पाणी द्या” हा संदेश देण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. या ग्रामसभेला गावातील सर्व आजीमाजी पदाधिकारी आणि विशेषतः युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं, अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

6 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

7 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

12 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

12 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

12 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

12 तास ago