क्राईम

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी एका सेवानिवृत्त सैनिकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास राजेश लंघे यांच्या घरासमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे.

मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या या मंडळींनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असता, गोळीबाराचा हा प्रकार परवानाधारक शस्त्राच्या बेकायदेशीर वापरामुळे घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये सेवानिवृत्त सैनिक विजय ज्योतिबा कसेकर (रा. भांडुप, मुंबई), राजेश सावळेराम लंघे (वय 44) आणि स्वाती राजेश लंघे (दोघेही रा. भांडुप, मुंबई; मूळ रा. सविंदणे) यांचा समावेश आहे. विजय कसेकर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल असून त्यांनी ते बेकायदेशीरपणे राजेश आणि स्वाती लंघे यांच्याकडे सोपवले होते. कोणताही शस्त्र परवाना नसतानाही या दोघांनी ते पिस्तूल लोड करून हवेत गोळीबार केला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचा वापर केल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. एका जबाबदार सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या शस्त्राची सुरक्षितता न राखता ते इतरांच्या हातात दिल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गोविंद ज्ञानदेव खटिंग (वय 40) यांनी स्वतः फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश लंघे आणि स्वाती लंघे यांनी जाणीवपूर्वक आणि बेजबाबदारपणे हवेत गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवृत्त सैनिकाने देखील आपल्या पदाची आणि शस्त्राच्या परवान्याची मर्यादा ओलांडून शस्त्र इतरांना हाताळायला दिल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. सध्या पोलिस या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करत आहे.

पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग हे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे. परवानाधारक शस्त्र हे केवळ स्वसंरक्षणासाठी असते, त्याचा वापर हवेत गोळीबार करून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी केल्यास परवाना रद्द करून कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Video: शिरूरचे दोन्ही आजी-माजी आमदारांनी गुनाट गावाला भेट देत केली गारपिटीची पाहणी…

अशोक खरात प्रकरण! शिरूरच्या राजकीय नेत्याला काही अटी शर्तीवर तात्पुरता जामीन, पण…

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago