ashok-kharat

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, अशाच एका व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील काही नामांकित राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्हिडिओ शिरूर तालुक्यात व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. शिरूर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

व्हिडिओत नेमकं काय दिसतंय…?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाचा माहोल दिसत असून, त्यामध्ये वादग्रस्त ठरलेल्या अशोक खरात याच्या पाठीमागे शिरूरचे काही स्थानिक नेते अगदी सहजपणे वावरताना दिसतात. याच ठिकाणी रुपाली चाकणकर यांचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हि केवळ योगायोगाने झालेली भेट आहे की…? यामागे काही ‘विशेष’ समीकरणे आहेत. याबाबत स्पष्टता नसली तरी संशयाची सुई मात्र थेट राजकीय नेत्यांकडे वळली आहे.

राजकीय वादळाची चाहूल…?
सार्वजनिक आयुष्यात शिरुरचे काही स्थानिक नेते अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत दिसल्यामुळे शिरुर तालुक्यातील राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विरोधकांना आयताच मुद्दा मिळाल्याने येत्या काळात आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी रंगण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा व्हिडिओ आगामी निवडणुकांमध्ये ‘वादग्रस्त’ ठरु शकतो.

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी…