Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

क्राईम मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पहिली घटना…
२१ जून २०२४ रोजी १० वर्षाच्या मुलाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही त्या वेळी प्रकरणाचा ठोस उलगडा झाला नव्हता.

शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात…

दुसरी घटना…
१७ मार्च २०२६ रोजी त्याच परिसरात  12 वर्षाच्या मुलाचा मुलाचा मृतदेह तशाच अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दोन्ही घटनांचे स्वरूप सारखे असल्याने संशय अधिक बळावला. घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयिताने खून केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्याने २१ जून २०२४ मध्ये दुसऱ्या मुलाचा त्याच पद्धतीने डोक्यात दगड मारून खून केल्याचे कबूल केले. यामुळे दोन्ही बालकांच्या हत्या एकाच आरोपीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

Video: शिरूर तालु्क्यातील चिमुकल्याची समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे हत्या? एक ताब्यात…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पहिल्या प्रकरणात सुरुवातीला योग्य तपास झाला नसल्याने आरोपी दीर्घकाळ मोकाट राहिल्याचा आरोप होत आहे. या कालावधीत तो परिसरात वावरत राहिल्याने त्याचे मनोबल वाढले आणि त्यातूनच दुसऱ्या बालकाचा बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पहिल्या घटनेवेळीच त्याला अटक केली असती तर दुसरा बळी गेला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

शिरूर! ‘सुलभ’ भिशी घोटाळा प्रकरणात संशयाचे सावट झाले गडद…