क्राईम

थरारक! शिरूरमधील व्यापाऱ्याला नगर-सोलापूर रोडवर दिवसाढवळया लुटले…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूरमधील गोळया बिस्कीटांचे होलसेल व्यापारी निखिल अच्छा व त्यांच्या सोबत प्रवास करणारे व्यापारी मित्र अरुण कानडे हे नगर-सोलापूर महामार्गावरून प्रवास करत होते. वाटेफळ गावच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबले असता टु व्हिलरवर आलेल्या अज्ञात चोरटयांनी काठीने मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिणे, कॅश व लायसन्स धारक रिव्हॉल्वर असा २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, १६ जुलै रोजी ११ वा. चे सुमारास निखिल अच्छा व त्यांचा मित्र अरुण मधुकर कानडे हे किरण परदेशी यांची एक्सप्रेसो गाडी नं MH 12 WK 7496 मध्ये शिरूरवरुन अहमदनगर येथे चॉकलेट गोळ्यांचा माल आणण्यासाठी तसेच त्यांच्या राशिन, कर्जत येथील प्रॉपर्टीचा व्यवहार करण्यासाठी ते शिरुर येथून निघाले होते. केडगाव येथे आदित्य श्रीमाळ यांना भेटुन त्यांना धंद्याचे व्यवहाराचे पैसे देवुन पुढे दुपारी ३ वा .चे सुमारास राशिन येथे जाणेसाठी ते निघाले. राशिनकडे जात असताना नगर सोलापुर रोडवरील वाटेफळ गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला ०४ वा. च्या सुमारास त्यांनी गाडी थांबवून लघुशंकेसाठी ते खाली उतरले. गाडीचे खाली उतरताच समोरच्या बाजुने रुईछत्तीशीच्या दिशेकडून राँग साईडने एक पॅशन व दूसरी सीडी १०० दु चाकीवर प्रत्येकी दोन जण असे चारजण त्यांच्या जवळ आले. तसेच त्यांचा पाठीमागुन दुचाकीवर एक व्यक्ती आला. असे पाच अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन थांबले.

पाठीमागून आलेल्याने निखिल अच्छा यांच्या डाव्या डोळ्याखाली बुक्की मारली व कॉलर पकडली. त्याचवेळेस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून आणखी चार जण आले. त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाकडे काठ्या होत्या. त्यांनी दोघांनाही काठीने मारहाण केली व ते सर्वजण तुमच्याकडे काय माल आहे तो काढुन द्या नाहीतर आम्ही तुम्हाला मारुन टाकु असे म्हणुन त्यांच्या सोबत झटापट करु लागले. त्यातील काही जणांनी निखिलच्या हातातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, कानातील एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, मोबाईल, 49 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे व रोख रक्कम 14,000/- रुपये बळजबरीने काढुन घेतले. तसेच निखिलचा मित्र अरुण याच्या खिशातील 84,000/-रुपये व मोबाईल बळजबरीने काढुन घेतले.

निखिलला थोडी मोकळीक भेटताच त्याच्या कमरेला लावलेला रिव्हॉल्वर स्वः संरक्षणासाठी काढला असता त्यातील एका ने लगेच त्याचा हात पकडुन रिव्हॉल्वर हिसकावला, सर्व जण दुचाकी गाड्यांवर बसून रुईछत्तीशीच्या दिशेने पळुन गेले. दोघेही खुप घाबरले होते. दोघे गाडीत बसुन जिव वाचवुन ते लोक परत येतील या भितीने नगरच्या दिशेने शिरुर पोलिस स्टेशनला गेले. शिरुर पोलिस स्टेशन येथे जाऊन तेथे त्यांच्याबरोबर झालेला प्रकार सांगितला. शिरुर पोलिसांनी नगर तालुका पोलिस स्टेशन येथे संपर्क करुन त्यांच्या सोबत वाटेफळ येथे घटना झालेल्या ठिकाणी घेवुन गेले. तेथे नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी देखील दाखल झाले. त्यांनी घटना ठिकाणची पाहणी केली व घटनेची चौकशी केली.

घटनेच्या वेळीत्यांच्या पाठीमागुन जी दुचाकी आली होती ती कोणती होती हे त्यांनी पाहीले नाही. तीनही दुचाकींना नंबर प्लेट नव्हत्या, सदर जण हे कोण होते ते त्यांना माहीत नाही. त्यांनी तोंडाला रुमाल व मास्क लावलेले होते. दोन जणांचे चेहरे उघडे होते. ९ अज्ञात चोरट्यांनी दोघांना काठीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवुन सोन्याचांदीचे दागिणे, कॅश रिव्हॉल्वर लुटून नेल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नगर तालुका पोलिस स्टेशन करत आहेत.

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा…

शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

5 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

5 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

5 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

5 तास ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

9 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

9 तास ago