शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिपक निंबा सूर्यवंशी (रा. मेशी, ता. देवळा, जि. नाशिक) याच्या विरुद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाबाद येथील विवाहित महिलेची एका व्यवसायाच्या माध्यमातून दिपक याच्या सोबत ओळख झाली होती. दरम्यान, दिपक याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. यांनतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार सुरु ठेवले. मात्र, पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने शिरुर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिपक निंबा सूर्यवंशी (रा. मेशी, ता. देवळा, जि. नाशिक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लतीफ मुजावर हे करत आहेत.
शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार
शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…
तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत महीलेवर केला बलात्कार