शिरुर (अरुणकुमार मोटे) पंढरपूर येथे सर्व भाविक आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी जात असतात, प्रत्येकाला वाटते तिथे जाऊन दर्शन घ्यावे, परंतु काहींना परिस्थितीमुळे शक्य होत नाही. देव हा माणसातच आहे, तुम्ही सर्व महिला या देवच आहात, कधीही काही अडचणी आल्या तरी तुम्ही नेहमी घरच्यासारखे येऊन सांगत जा. महिलांच्या ज्या सरकारी योजना आहेत त्या बाबत सर्वांना माहिती सांगितली असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी केले. यावेळी महिलांना आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, महिलांनीचं एकमेकांना समजून घेऊन,अडचणीच्या वेळेस कोणताही भेदभाव न करता मदत केली पाहीजे. मनुष्यजीवन एकदाचं आहे. त्यामुळे माणसातच आपण देव पाहिला पाहिजे. आपल्याला पंढरपुरला जाऊन जरी देवाचे दर्शन घेता आले नाही. तरी चालेल परंतु जो अडचणीत आहे, जो भुकेला आहे, त्याला सहकार्य करा त्यातच आपल्याला विठ्ठल भेटेल.
यावेळी राणी कर्डिले, डॉ स्मिता कवाद, गीता आढाव, सीमा शिंदे, संगीता शेवाळे, संगीता रोकडे, ज्योती लोखंडे, शितल शर्मा, निर्मला ढोकले, ललिता पोळ, सविता बोरुडे, कल्पना चांदगुडे, दुर्गा ननवरे, प्रीती बनसोडे, राजश्री शेजवळ, भाग्यश्री लिंगे, मनीषा टेभेंकर, सुजाता रासकर, सागर नरवडे, राजुद्दीन सयद,अमित शिर्के, प्रशांत पवार, हाफिस बागवान, कलीम सय्यद, युवराज सोनार, राहील शेख, ऋषभ मुथा, आदित्य उबाळे, हर्षद शेख तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?
शिरुर; कृषी दिनानिमित्त कृषी सहायक जयवंत भगत यांचा सन्मान
दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…