क्राईम

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेले तिघे जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर दरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना कंटेनर वाहन व दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरुर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पकडलेल्या तिघांकडून १५ लाख १७ हजाराचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहे.

पोलिसांनी कुतुबुद्दीन अख्तर हुसेन (वय ३१ वर्षे रा. सोमका ता. पहरी जि. भरतपूर राजस्थान), यासीन हारुन खान (वय ३२ वर्षे रा. मुदैता ता. पुन्हाना जि. नुहू राजस्थान), व राहुल रशिद खान (वय ३२ वर्षे रा. फलैंडी ता. पुन्हाना जि. नुहू राजस्थान) यांसह पळून गेलेले नौशाद उर्फ नेपाळी व लेहकी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार संजू ज्ञानदेव जाधव (रा. शिरुर) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

पुणे-नगर महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार संजू जाधव, राजू मोमीन, जनार्दन शेळके व तुषार पंधारे हे सरदवाडी येथे रात्रगस्त घालत असताना येथील हरियाना राजस्थान मेवात ढाब्याजवळ काही नागरिक आर जे ५२ जि ए ७९१६ या कंटेनर मध्ये दरोड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर त्यांनी शिरुर पोलिसांना माहिती देत शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलिस हवालदार नाथा जगताप, पोलिस शिपाई निखील रावडे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, विजय शिंदे यांना बोलावून घेत कंटेनर जवळ गेले असता पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण पळून गेले.

दरम्यान, पोलिसांनी कंटेनरमध्ये पाहणी केली त्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले तिघेजण मिळून आले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गॅस सिलेंडर, कटावणी, लोखंडी गज, दोरी यांसह आदी साहित्य मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील कंटेनर तसेच दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा तब्बल पंधरा लाख सतरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गिरी हे करत आहेत.

शिरूर पोलिसांनी टाकला गावठी दारू हातभट्टीवर छापा; मुद्देमाल नष्ट…

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago