kawthe-liquor
शिरूर (अरुणकुमार मोटे) : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे रोहिलवाडी परिसरामध्ये गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करत शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी रसायनासहीत उध्वस्त केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील कवठे येमाई गावच्या हद्दीत रोहीलवाडी, पवार वस्ती, घोडनदी परीसरातील काटवनात १) अक्षय बाळु देवकर व २) सागर गणपत गंडगुळ (दोन्ही रा. कवठेयमाई ता. शिरूर) हे मानवी आरोग्यास अपायकारक असणारे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तापवून गाळून त्यापासुन तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू तसेच ताडी लोकांना पिण्याकरिता विक्री करत असल्याची बातमी मिळाली होती.
सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे, नितिन सुद्रिक, पो. अं. निखिल रावडे, पो.अं. सचिन भोई यांनी छापा कारवाई करून एकूण १,५४,८७५/- रू. किंमतीची गावठी हातभट्टी दारू, कच्चे रसायन, ताडी व गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक साहित्ये जण करून जागीच नष्ट करून छापा कारवाई करून आरोपी १) अक्षय बाळू देवकर व २) सागर गणपत गंडगुळ (दोन्ही रा. कवठे येमाई ता. शिरूर) यांच्याविरूध्द शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख (भा.पो.से.), अपर पोलिस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदेश केंजळे, पो.हवा. भवर, सांगळे, सुद्रिक, पो.अं.रावडे, पो.अं. सचिन भोई यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई दिलीप पवार हे करीत आहेत.
नागरीकांना शिरूर पोलिसांचे आवाहन…
शिरुर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील नागरिकांना आव्हाण करण्यात येते की, आपल्या आसपास कोणी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार करीत असल्यास त्याबाबत पो.नि. संदेश केंजळे मो.नं. ७७३८६०१९९१ यावर माहिती दयावी. माहिती देणा-याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांना केले आहे.
शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…
शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…
शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…
शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…