क्राईम

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू होती. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा तो तहान भूक लागल्यानंतर नातेवाईकांच्या घरी गेला, तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर एका बेबी कॅनॉलमध्ये झोपलेल्या अवस्थेत दत्ता गाडे सापडला. पण त्याआधी पोलिसांकडून दत्ता गाडे समजून दुसऱ्याच गाडेला उचलले होते, त्याच कारण म्हणजे दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ हे दोघे सेमच दिसतात.

आरोपीचा फोटो घेऊन पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या गुनाट (ता. शिरूर) या मुळगावी पोहोचले. पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता. त्या फोटोतील आरोपीसारखा दिसणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दत्ता गाडे सापडला असं पोलिसांना वाटलं होतं. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पण आपण ज्याला शोधत आहे, तो दत्ता गाडे पकडलेला आरोपी नाही असं सांगितल्यानंतर पोलिसांनी डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसला नाही.

पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी हा दत्ता गाडे नसून त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा त्याचाच भाऊ असल्याचे 15 ते 20 मिनिटांनी स्पष्ट झाले होते. आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता. तो दिसायला अगदी आरोपी दत्ता गाडे सारखा असल्याने पोलिसही चक्रावून गेले होते. पण, त्यावेळी तो मी नव्हेच असं दत्ता गाडेचा भाऊ सांगत होता. माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्ही दत्ता गाडे याला शोधताय ना? असा प्रश्न दत्ता गाडे याच्या भावाने केला. त्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडे याच्या भावाला सोडून दिले आणि त्याची चौकशी करायला सुरवात केली.

दरम्यान, रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होत आहे. मला सरेंडर व्हायचं आहे, असे तो बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय लपून बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले आहे. दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. रात्री 2 वाजता त्याला पुण्यात आणले. 3 वाजता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करणार येणार आहे.

दत्तात्रय गाडे आणि त्याचा भाऊ सारखे दिसतात. दत्ता गाडे याच्या मोबाइलवरून त्याच्याशी सातत्याने संपर्कात असलेल्या काही जणांची चौकशीही करण्यात आली, अशी माहिती देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

3 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

17 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

24 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago