शिरूरच्या पत्रकारांचे शिरूर तहसिलदार व शिरूर पोलिसांना लेखी निवेदन
शिरूर (अरूणकुमार मोटे): मंचर येथे पत्रकारांना मारहाण, धक्काबुक्की, शिवीगाळ झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिरुर तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने शिरूर येथे निषेध करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूर पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
मंचर येथे समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका बांधकाम व्यवसायिक आणि त्याच्या नातेवाईकांनी अश्लिल शिवीगाळ करत, मारहाण केली. याबाबत पोलीसांत तक्रार दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मंचरच्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या बांधकाम व्यवसायिकाने त्यांच्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी केल्याचा संशय, वीज मीटरमध्ये हेराफेरी करून विजचोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय तसेच या इमारतीमधील सदनिकेची विक्री करुन या ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिका धारकांची फसवणूक असे प्रकार उघडकीस येण्याचे रागातुन संबंधितांनी संपादिका स्नेहा बारवे, समीर राजे याना शिवीगाळ मारहाण केल्याचे कृत्य केले आहे. या घटनेचा शिरुर तालुका पत्रकार महासंघ निषेध व्यक करत आहेत.
याबाबत संबंधित दोषी व्यक्तींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शिरूर तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. यावेळी शिरूर तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष तथा पत्रकार अरुणकुमार मोटे,शिरुर तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल बोंबे, उपाध्यक्ष सुनिल जिते, माजी अध्यक्ष तेजस फडके, कार्याध्यक्ष सागर रोकडे,शिरूर शहराअध्यक्ष निलेश काळे, साहेबराव लोखंडे, धनंजय साळवे आदी पत्रकार उपस्थित होते.
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…
मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…