क्राईम

कासारीतून सेंट्रींग कामाच्या प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील बंगल्याच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणहून सेंट्रींग कामाच्या प्लेटा चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांच्या प्लॉटिंगमध्ये इस्माईल खान यांच्या बंगल्याचे काम सुरु असून सदर काम रामानंद चौहान हे ठेकेदार करत आहेत, सध्या बंगल्याचे काम सुरु असल्याने चौहान यांनी सदर ठिकाणी सेंट्रींग कामाच्या प्लेटा ठेवलेल्या आहेत. २९ जानेवारी रोजी दिवसभर कामगार काम करुन घेरी गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा आले असतान त्यांना सदर ठिकाणी ठेवलेल्या सेंट्रींग कामाच्या तब्बल 20 प्लेटा व काही साहित्य मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला सर्वत्र पाहणी केली असता कोठेही प्लेटा व इतर साहित्य मिळून आले नाही.

त्यामुळे सदर ठिकाणच्या प्लेटा व आदी साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने रामानंद जगती चौहान (वय ५१) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मिसरवली ता. घोशी जि. मऊ राज्य उत्तरप्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago