रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पुरवठा विभागाची लक्तरे काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वेशी वरती टांगली गेली असून दिवाळी संपली तरीही शिरूर तालुक्यातील काही हेकेखोर रेशनिंग दुकानदार व अधिकाऱ्यांच्या अभद्र वृत्तीमुळे नागरिकांना रेशनिंग पासून वंचित राहावे लागले आहे. तर काही दिव्यांग नागरिकांना रेशनिंग दुकानदाराच्या मुजोर प्रवृत्ती मुळे रेशनिंग उपलब्ध झाले नाही.
याबाबत संबंधितांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुरवठा अधिकाऱ्यांनी ही संबंधित दिव्यांगास रेशनिंग उपलब्ध होईल अशी काहीही उपाययोजना केली नाही उलट रेशनिंग दुकानदाराचीच पाठराखण केली. त्यामुळे संबंधित रेशनिंग दुकानदाराला योग्य ती समज द्यावी अशी लेखी मागणी करुन ही अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याने संबंधित पुरवठा अधिका-याने आर्थिक हितसंबंधामुळेच रेशनिंग दुकानदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप दिव्यांग नागरिक खंडेराव गोरडे यांनी केला आहे.
वाघाळे येथील खंडेराव गोरडे हे त्यांच्या भावा समवेत रेशनिंग आणण्यासाठी गेले असता रेशनिंग वाटपाची मुदत संपली असल्याचे रेशनिंग दुकानदार अशोक थोरात यांनी सांगितले व रेशनिंग दिले नाही. याबाबत खंडेराव गोरडे यांनी पूरवठा अधिकारी अतुल गायकवाड यांना या बाबत माहिती देऊन लेखी तक्रार केली आहे. मात्र गेल्या महिनाभरात पूरवठा अधिकारी अतुल गायकवाड हे रेशनिंग दुकानावर आलेच नाहीत. व दिव्यांग खंडेराव गोरडे यांच्या अर्जाची दखल ही घेतली नाही. एरवी तक्रारी ची दखल घेऊन कारवाई करतो म्हणणारे पुरवठा अधिकारी अतुल गायकवाड संबंधित दुकानदारावर कारवाई करताना शांत का? असा सवाल निर्माण झाला आहे.
जर पुरवठा विभागाने संबंधित रेशनिंग दुकानदारावर कारवाई केली नाही. तर अधिका-याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा प्रहार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब नवले यांनी दिला आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…
मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…