मनोरंजन

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मोठा ट्विस्ट; डबल एव्हिक्शनची चर्चा, आयुष-करणबाबत उत्सुकता शिगेला!

मुंबई: लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी मध्ये पाचव्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात घरातून दिव्या शिंदे हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार ओमकार राऊतचीही एक्झिट झाली. सलग दोन सदस्य घराबाहेर गेल्यानंतर या आठवड्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.घरातील सहा सदस्य नॉमिनेशनमध्ये असल्याने यावेळी पुन्हा एव्हिक्शन होणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार या आठवड्यातही डबल एव्हिक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे.

आयुष संजीवचा प्रवास संपला?

पाचव्या आठवड्यात आयुष संजीव फारसा दिसला नाही. घरात राखी सावंत यांच्या एन्ट्रीनंतर अनेक सदस्य पुन्हा अॅक्टिव्ह झाले असताना आयुष मात्र कॅमेऱ्यासमोर कमीच दिसला. कोणत्याही टास्कमध्ये त्याचा ठळक सहभाग नव्हता, तसेच भांडणांपासूनही तो दूर राहिला. त्याची प्रकृतीही ठीक नसल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्याला गेममधून बाहेर काढण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर आयुष संजीवची या वीकेंडला घरातून एक्झिट झाल्याची चर्चा रंगली आहे.

करण सोनावणेही बाहेर?

डबल एव्हिक्शन असल्याने दुसरा सदस्य कोण, याची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडिया स्टार करण सोनावणे याचे नाव समोर येत असून तोही घराबाहेर गेल्याची चर्चा आहे. करणचा प्रवास इतक्या लवकर संपल्याची बातमी ऐकून त्याचे चाहते निराश झाले आहेत.मात्र काही जणांनी करणला ‘सिक्रेट रूम’मध्ये ठेवण्यात आलं असावं, असा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यामुळे तो खरंच बाहेर गेला की शोमध्ये काही मोठा ट्विस्ट आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.

अधिकृत घोषणा बाकी

करण आणि आयुष यांच्या एव्हिक्शनबाबत कलर्स मराठी किंवा बिग बॉस मराठी कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रविवारी ‘भाऊच्या धक्क्यावर’ होस्ट रितेश देशमुख नेमकी कोणाची एक्झिट झाली हे जाहीर करणार आहेत.

आता खरंच डबल एव्हिक्शन झालं आहे का? आयुषचा प्रवास इथेच थांबला का? आणि करण सोनावणे घराबाहेर गेला की सिक्रेट रूममध्ये आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना रविवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

18 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago