मनोरंजन

‘मी जिंकून घेईन सारं!’ १६ मार्चपासून सायं. ७ वाजता; कलर्स मराठीवर नव्या मालिकेची एंट्री

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना ‘मी जिंकून घेईन सारं!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्यांच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी तांबट दिसणार आहे. जान्हवी यापूर्वी ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘अबोल प्रितीची अजब कहाणी’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे.

तसेच अभिनेता अमित रेखी, संचित चौधरी आणि दिशा दानडे यांचीदेखील मालिकेत महत्त्वाची भूमिका असणार आहे. खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता फडके झळकणार असून तिच्या व्यक्तिरेखेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या सायंकाळी ७ वाजताच्या स्लॉटला ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरू आहे. मात्र नव्या मालिकेच्या आगमनामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेसहाला प्रसारित होणारी ‘इंद्रायणी’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून २१ फेब्रुवारीला तिचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

दरम्यान, ‘मी जिंकून घेईन सारं!’च्या पहिल्या प्रोमोला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून आता मालिकेला प्रत्यक्ष प्रसारणानंतर प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago