मनोरंजन

‘मोहिनी’ची दमदार एन्ट्री! अनघा ठाकूर-समीर परांजपे मुख्य भूमिकेत

मुंबई: छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना कलर्स मराठीने आणखी एका मालिकेची घोषणा करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’नंतर आता ‘मोहिनी’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी फक्त टीझरमधून ‘मोहिनी’ची झलक दाखवण्यात आली होती. मात्र, आता अधिकृत प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेबाबतची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, मालिकेच्या नावाप्रमाणे ‘मोहिनी’ची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर अभिनेत्री अनघा ठाकूर हिची या मुख्य भूमिकेसाठी निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मालिकेद्वारे अनघा पहिल्यांदाच मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

अनघाच्या जोडीला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला होता. त्यानंतर स्टार प्रवाहवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. आता तो पुन्हा एकदा कलर्स मराठीवर कमबॅक करत आहे.या मालिकेत समीर ‘RK’ ही भूमिका साकारणार असून, मोहिनीचा स्वाभिमान आणि RK चा अहंकार यांच्यातील संघर्ष ही कथेची मध्यवर्ती बाजू असणार आहे. या नात्यातून उलगडणारा भावनिक आणि नाट्यमय प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर ‘मोहिनी’ ही मालिका कलर्स हिंदीवरील गाजलेल्या मधुबाला – एक इश्क एक जुनून या मालिकेचा रिमेक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.‘मोहिनी’ची प्रसारण तारीख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, ही मालिका नेमकी कधी छोट्या पडद्यावर झळकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

24 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

24 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

24 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago