मनोरंजन

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये तिहेरी वाइल्ड कार्ड एन्ट्री? घरात रंगणार नवा ड्रामा!

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनला आता चांगलीच रंगत आली असून लवकरच ५० दिवसांचा टप्पा पूर्ण होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात नेहमीप्रमाणे रविवारी नव्हे, तर शनिवारीच एलिमिनेशन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या आठवड्यात राकेश, रोशन, राखी आणि प्राजक्ता हे चार जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. त्यापैकी रोशन भजनकरचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र, याचबरोबर प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का तयार असल्याचं बोललं जात आहे.

घरात येणार तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, एकूण तीन वाइल्ड कार्ड स्पर्धक घरात एन्ट्री घेणार आहेत. या तिन्ही नावांभोवती सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.

१) अभिनेत्री रेवा कौरसे

‘टेलीचक्कर’च्या रिपोर्टनुसार रेवा कौरसे ‘बिग बॉस मराठी’मध्ये प्रवेश करणार आहे. तिने हिंदी मालिकांमधून आपली छाप पाडली आहे. विशेषतः दीवानियात आणि प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती या मालिकांमधील तिच्या भूमिकांमुळे ती चर्चेत आली.

२) संस्कृती साळुंखे

रिअ‍ॅलिटी शोजमधून घराघरांत पोहोचलेली संस्कृती साळुंखे हिचं नावही वाइल्ड कार्डसाठी चर्चेत आहे. झी मराठीवरील जाऊ बाई गावात या कार्यक्रमामुळे ती विशेष प्रसिद्ध झाली. ‘पापा की परी’ म्हणून ओळखली जाणारी संस्कृती घरात गेल्यावर नेमका कसा खेळ खेळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३) संकेत पाठक

स्टार प्रवाहचा लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक हाही घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. त्याने लग्नाची बेडी आणि छत्रीवाली या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटातही तो झळकला आहे.

अधिकृत घोषणा अद्याप बाकी

दरम्यान, या तिन्ही स्पर्धकांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत अद्याप कलर्स मराठी किंवा ‘बिग बॉस मराठी’कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जर ही तिहेरी एन्ट्री खरी ठरली, तर घरातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.आता येत्या काही दिवसांत नेमका कोण घरात प्रवेश करणार आणि कोणाला निरोप घ्यावा लागणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

8 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

8 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

9 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 तास ago