मुख्य बातम्या

MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकीत औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे कंपनीलगतच असणारी शेतजमीन पुर्णपणे नापिक झाली असल्याने उद्या बुधवार दि २ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच पत्नी आणि मुलांसह आत्मदहन करण्याचा इशारा मातंग नवनिर्माण सेनेचे शिरुर तालुका सचिव मच्छिंद्र जाधव यांनी दिला आहे.

याबाबत निमगाव भोगी (ता. शिरुर) गावचे रहिवासी असलेल्या मच्छिंद्र एकनाथ जाधव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, शिरुरचे तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

या निवेदनात जाधव यांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासुन रांजणगाव एम आय डी सी मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन सोडले जाणारे अतिकेमिकलयुक्त घातक पाणी थेट माझ्या शेताकडे सोडलेले आहे. त्यामुळे माझी शेती पुर्णपणे नापीक झाली आहे. त्यामुळे वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे

१) कंपनी प्रशासनाने आमची नुकसान भरपाई द्यावी.

२) कंपनीला दिलेला वाढीच भूखंड रद्द करण्यात यावा.

३) कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी.

आदी मागण्यांसाठी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, आंदोलने केली, परंतु झोपलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपनीवर कोणतीही कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे मला न्याय मिळेल हि आशा आता मावळली आहे. मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे म्हणून मी माझ्या बायको मुलांसह बुधवार दि २ ऑक्टोबर २०२४ या दिवशी कंपनीच्या गेटसमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

खासदार अमोल कोल्हे यांचाही MEPL विरोधात ‘एल्गार’  

शिरुर लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही लोकसभेत महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनी विरोधात आवाज उठवत हि कंपनी पाण्यातुन घातक केमिकल सोडत असल्याने बंद करण्याची मागणी केली होती. परंतु शासनाने अजुनही त्यावर काहीच ठोस भुमिका घेतलेली नसल्याने MEPL कंपनी सुरुच आहे.

 

MEPL कंपनी बंद करण्यासाठी यापुर्वीही अनेक आंदोलने पण…

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे आसपासच्या गावांमधील ओढे, नाले, विहिरी, बोअरवेल यांचे पाणी दुषित झाले असल्याने निमगाव भोगी सह शिरुर पंचंक्रोशीतील अनेक गावातील ग्रामस्थांनी दि २० सप्टेंबर २०२४ रोजी पुणे-महामार्गावर रास्तारोको करत आंदोलन केले होते. परंतु अजुनही प्रशासनाला जाग आलेली नाही.

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

3 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

3 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

3 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

3 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

14 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

18 तास ago