मुख्य बातम्या

प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): आमदाबाद (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी सुजाता नितीन थोरात यांना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झालेला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २७-०९-२०२४ रोजी मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा, संचालक कृषी नायकवडी तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

सुजाता नितीन थोरात यांना रोख रक्कम ४४००० रु व एक पैठणी साडी देण्यात आली. शिरूर तालुक्याला सुजाता थोरात यांच्या रुपाने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळे शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. सुजाता थोरात यांचे पती नितीन थोरात हे देखील प्रगतशील शेतकरी आहेत. आज पुरस्कार मिळाल्यानंतर सुजाता थोरात व त्यांच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. थोरात यांच्या निवडीने शिरूर व आमदाबाद परिसरातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना तालुका पंचायत समितीच्या शिफारसीने पुणे जिल्हा परिषदकडूनही थोरात यांना “कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” देण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात म्हणाल्या, ‘शेतकरी भविष्यात हायटेक शेतीकडे वळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तीकडे वाटचाल होऊन, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, यासाठी पुढील काळात हायटेक शेती करणारे शेतकरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

11 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

17 मिनिटे ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

19 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

23 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

23 तास ago