dilip-walse-patil
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये बुधवारी (ता. १३) सभा घेतली होती. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असे म्हणत त्यांचा पराभव 100 टक्के करा, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.
Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार
शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसेंनी सभेनंतरची पत्रकार परिषद अचानकपणे रद्द केली. दिलीप वळसे पाटील यांनी तूर्तास यावर काही न बोलण्याची भूमिका घेत अखेरच्या सभेत बोलणार असल्याचे सांगितले.
शरद पवार म्हणाले, ‘दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती. ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळs आता आपल्यासोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. वळसे पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा.’
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंबेगाव विधानसभा मतदारंसघातून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर आढळराव पाटील म्हणाले…
मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?
मतचाचणी! दिलीप वळसे पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाणार…?
Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…
शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…
दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…