मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारेगाव (ता. शिरुर) येथे छापा टाकून बांगलादेशातील चार नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्य करताना अटक केली असुन त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कारेगाव येथुन १) कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. फुलताला, जि. खोलना, बांगलादेश), २) अकलस मजेद शेख (वय ३९, रा. गोपालगंज, बांगलादेश), ३) मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय ३५, रा. कालिया, नोडाइल, बांगलादेश), ४) जाहिद अबूबकर शेख (वय ३०, रा. कालिया, नोडाइल, बांगलादेश) अशी अटक केलेल्या चार आरोपीची नावे आहेत.

वरील चार आरोपी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात अनधिकृतरित्या प्रवेश करुन मागील दोन वर्षांपासून कारेगाव येथे वास्तव्य करत होते. आरोपींकडे बनावट भारतीय आधार कार्ड असल्याचेही समोर आले आहे.

अशी झाली कारवाई….

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांना कारेगाव येथे काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत दि ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री ११:२० पर्यंत छापेमारी करुन चार जणांना ताब्यात घेतले.

त्यानंतर (दि १२) जुलै रोजी पहाटे ३:४५ वाजता पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे मोसिन बशीर शेख यांनी फिर्याद दिल्याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार विशाल गव्हाणे, दत्तात्रय शिंदे, विशाल भोरडे, रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने व पोलीस पथकाने हि कारवाई केली. आरोपींना शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांची दि १५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

शिरुर-चौफुला रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

16 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago