मुख्य बातम्या

रामलिंग ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाबुरावनगरात नागरिक त्रस्त; चेंबर चोक, रस्त्यांची दुर्दशा

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगर या मोण्या उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबुरावनगरचा विकास ठप्प झाला असून नागरिक मात्र संतप्त झाले आहे.

रस्त्यावरील चेंबर चोक झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्थाच कोलमडली असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्थानिक रहिवासी उद्धव जाधव यांनी सांगितले की, “आमच्या बिल्डिंगजवळील चेंबर चोक झाल्यामुळे आमच्या संकुलातील चेंबरही अडले आहेत. दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, प्रशासनाकडून फक्त आश्वासनांची खैरात चालू आहे. प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही.”

लोकनेते आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या बाबुरावनगरमध्ये त्यांच्या हयातीत अडीच कोटींची पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते आणि नवीन भुयारी गटार योजना अशा अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर या बाबुरावनगरची अवस्था सुविधेवाचून दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

बाबुरावनगरमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असतानाही, रस्ते, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन या तिन्ही बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसते. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी मुरूम टाकण्याची आवश्यकता असताना तेही होत नाही.

ड्रेनेज तुंबल्यावर नागरिकांकडून सतत फोन व तक्रारी करूनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केवळ मौखिक आश्वासन मिळते. काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये बिनधास्तपणे कचरा टाकला जात असून, यावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन कचरा फेकला जातो; त्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी केली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कृती झालेली नाही.ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. “आता आम्ही केवळ ग्रामपंचायतीचे डोळे उघडण्याची वाट पाहत आहोत,” असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

5 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

12 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago