शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे भरधाव टेम्पोने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र, शिरूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
ही घटना ११ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास शिरसगाव काटा येथील तळ्याजवळ घडली असून अज्ञात टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९, रा. बडवाणी, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला, तर टिकम जमरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली. पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अंमलदार नितेश थोरात आणि रविंद्र आव्हाड यांनी शिरसगाव काटा, पिंपळसुटी, निर्वी, तांदळी आणि काष्टी या परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित वाहन अशोक लेलंड टेम्पो (क्र. KM-25AJ-7637) असल्याचे निष्पन्न झाले.
तपासाअंती संबंधित टेम्पो वारे वडगाव (ता. भूम, जि. धाराशिव) येथे असल्याचे समजले. सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप आणि अंमलदार रविंद्र आव्हाड यांच्या पथकाने वारे वडगाव येथे जाऊन वाहन जप्त केले. आणि चालक प्रितेश राजेंद्र गायकवाड (रा. चारे वडगाव, ता. भूम, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने अपघात केल्याची कबुली दिली. या तपासाची आणि अटकेची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांच्या पथकाने केली.
अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्याची शिरूर पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद ठरत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करीत आहेत.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…