आरोग्य

कावीळ होऊ नये म्हणून योग्य निदान, लक्षणे, उपाय कसे कराल…

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे.

कावीळ होण्याची विविध कारणे…

जंतुसंसर्गामुळे…

ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्गामुळे अति सूक्ष्मजीवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते. हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई विषाणू : हे विषाणू दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याच मुळे होते. जिची लक्षण पाहून व रक्त तपासणी करून निदान पक्केकरता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्त तपासणीमध्ये बिलीरुबीन, एसजीओटी, एसजीपीटी, जीजीटी हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हेपाटायटीस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटीस ई होतो.

हेपेटायटिस बी आणि सी…

हे विषाणू रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्या मुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरॉयसिस होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते, म्हणूनच कावीळचे योग्य निदान करणे आवश्यक असते.

हेपेटायटिस बी आणि सी यांची कारणे पुढीलप्रमाणे…

1) दूषित रक्त चढवल्याने बी आणि सी विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात.

2) इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे. शिवाय ऑपरेशनची इन्स्ट्रुमेंट्स जर हेपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे इन्फेक्टेड असतील व नीट निर्जंतूक नसतील, तर रुग्णाला हेपेटायटिस बी आणि सी होऊ शकतो.

3) ड्रग ॲडिक्ट…

स्वतःला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा विषाणू शरीरात शिरू शकतो. टॅटू करून घेतल्याने हा विषाणू शरीरात शिरू शकतो.

4) आई यामुळे इन्फेक्टेड असेल, तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हा आजार होऊ शकतो.

कावीळचे निदान…

1) रुग्णाची नीट तपासणी केली जाते – यकृताला किती सूज आहे ? हे पाहिले जाते.

2) विविध रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते ? तिची तीव्रता कळते.

3) अल्ट्रासोनोग्राफी करून लिव्हरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तनलिका इ. पाहिले जाते. या पलीकडे सिटी स्कॅन, एमआरआय, एंडोस्कोपी करून पुढचे तपास केले जातात. यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे, हे वरील तपासणीतून कळते. कावीळचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार केल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे महत्त्वाचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

1 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago