मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे गावावर मध्यरात्री दुःखाचा डोंगर कोसळला असुन न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान झालेल्या भीषण अपघातात काळे कुटुंबातील दोघांचा तर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला असुन एक जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या दुर्घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना मृत घोषित केले, तर एका गंभीर जखमीवर उपचार सुरु असल्याचे समजते.

या अपघातात पवन राजहंस काळे (वय 38) आराध्या पवन काळे (वय 9) आणि पवन काळे यांचे मेहुणे बाळासाहेब नागवडे (वय 38) यांचे निधन झाले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, रस्त्याची परिस्थिती किंवा इतर तांत्रिक कारणांचा तपास पोलीस करत आहेत. पंचनामा करुन पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

या घटनेमुळे निमोणे गावात शोककळा पसरली आहे. काळे कुटुंब हे सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि सर्वपरिचित कुटुंब म्हणून ओळखले जाते. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, नागरिकांकडून न्हावरे चौफुला रोडवरील वाढता वेग, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि रस्त्यावरील धोकादायक वळणांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

(हि बातमी अद्याप प्राथमिक माहितीनुसार असून अधिकृत तपशील आल्यावर सविस्तर बातमी प्रसिद्ध करण्यात येईल.)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

53 सेकंद ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांतदादा पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

17 मिनिटे ago

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

16 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

3 दिवस ago