RANJANGAON
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मध्ये सोमवार (दि 2) रोजी एका ट्रक चालकाकडुन माथाडीचे कामगार असल्याचे सांगत खंडणी उकळत हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने ट्रकचालक विठ्ठल बबन कचरे (वय 36) रा. पाडळी लोणंद, ता. खंडाळा जि.सातारा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दखल केल्याने पांडुरंग बबन अभंग, लक्ष्मण गोरडे, महादेव मलगुंडे या तीन जणांवर गुन्हा दखल झाला आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील तिन्ही आरोपीनी फिर्यादीला आम्ही हमाल पंचायत मंडळाचे कामगार आहे असे म्हणुन पावती घे नाहीतर तुझी गाडी खाली होवुन देणार नाही अशी धमकी देवून फिर्यादीकडुन फोन पे वर पैसे घेवुन खंडणी वसूल केली. तसेच सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर जीवंत सोडणार नाही असे म्हणुन पावती न देता निघुन गेले.
त्यामुळे ट्रकचालक विठ्ठल कचरे यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत पांडुरंग अभंग, लक्ष्मण गोरडे, महादेव मलगुंडे या तिघांच्या विरोधात फिर्याद दखल केली. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडेहे पुढील तपास करत आहेत.
माथाडीच्या नावाखाली बोगस पैसे उकळल्यास कायदेशीर कारवाई: उद्योगमंत्री
रांजणगाव MIDC त बोगस माथाडीच्या पावत्या फाडल्याप्रकरणी माजी सरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यातील त्या कंपनीत आम्हाला माथाडी कामगारांचा ठेका द्या नाहीतर…
माथाडीच्या नावाखाली “खंडणी” वसुल करणारा खरा सूत्रधार अजुनही मोकाट…?
शिरुर तालुक्यात माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्याप्रकरणी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली चाललीये लुट अरे ड्रायव्हर भाऊ जागा हो ऊठ…
पुणे जिल्हा माथाडी मंडळ बरखास्त करा; संदीप कुटे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…
रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या दाखवत बेकायदेशीर पैसे वसुली सुरुच
रांजणगाव MIDC त ‘माथाडी’ च्या नावाखाली जबरदस्तीने ‘पैसे वसुली’
रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…
कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…