Ajit Pawar
पुणे: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला लागला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतले. समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड, राजगुरूनगरमध्ये त्यांनी धक्का दिला आहे. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंना ठाकरे यांनी शिवबंधनात बांधून घेतले आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांना ही उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे खेचले होते. मावळ लोकसभेत वाघरे यांच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहिते यांच्या रूपाने ठाकरे यांनी अजित पवार यांना धक्के दिले आहेत.
डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील कोण आहेत?
आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे
माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस
माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस
माजी राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
निरीक्षक- उत्तराखंड, झारखंड, छ्तीसगड, लक्षद्वीप
शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…
अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…
अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…
अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…