मुख्य बातम्या

शिरुर; अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निलेश वाळुंज यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन…

शिरुर (अरूणकुमार मोटे) पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता (कलकत्ता) येथे डॉ. महिला व बदलापूर (महाराष्ट्र) मध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी, न्यायासाठी उत्तम व्यवस्था उभी करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थेच्या, राज्यकर्त्याच्या आणि अशा गंभीर घटना गांभिर्याने न घेणाऱ्या दोषी पोलिसांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे शुक्रवार दि २३ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन आणि निषेधात्मक मुंडण करणार आहेत.

 

सदरची घटना या अतिशय गंभीर स्वरुपाच्या असून देशातील विविध राज्यांमध्ये सातत्याने महिला, मुली व अल्पवयीन मुलींवरती अन्याय, अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. कदाचित असा एकही दिवस जात नाही की, अशा घटनांबाबतचे वृत्त प्रसारीत होत नाही. त्यामुळे महिला व नागरीकांच्या मनामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व न्याय मिळण्याच्या दृष्टीने भिती निर्माण होत आहे.

 

सदर घडलेल्या घटना या मन हेलावुन टाकणाऱ्या व अतिशय गंभीर स्वरुपाच्या असुन व देशात या घडलेल्या पहिल्याच घटना नसून यापुर्वी देखील अशा स्वरुपाच्या घटना घडलेल्या आहेत, असे असताना देखील आपली सरकार या घटनांना पुर्णतः लगाम लावण्यासाठी अयशस्वी ठरल्याचे दिसत आहेत.

 

त्यामुळे विषयांकित घटनांबाबत अशी कृत्य करणा-या प्रवृत्तींवर कोणतीही दया न दाखवता कायदयामध्ये याबाबत कठोर शिक्षेबाबत तरतुदी करणे हे पुढील काळासाठी आवश्यक आहे व यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असे अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना ज्या पद्धतीची शिक्षा, शासन केले जात होते. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर जरब बसत होता, अशा शिक्षेचा अवलंब करणे आता आवश्यक व गरजेचे झाले आहेत.

 

याबाबत सर्व सरकारांनी गांभिर्याने विचार करुन ठोस पावले उचलली पाहिजेत तसेच अशा घटनांमध्ये हलगर्जीपणा करणा-या व नागरिकांच्या न्यायिक हक्कांवर गदा आणणाऱ्या दोषी पोलिसांचे फक्त निलंबन न करता त्यांना कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात येऊन फौजदारी कारवाई करण्यात यावी. यासाठी विषयांकित घटनांच्या निषेधार्थ शुक्रवार दि. २३ ऑगस्टरोजी तहसिल कार्यालय शिरूर येथे निलेश वाळुंज मुंडण करुन उपोषण आंदोलन करणार आहेत.

शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

रांजणगाव MIDC तील जामिल कंपनीत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर व सुपरवायझरवर गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

54 मिनिटे ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

56 मिनिटे ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

1 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

17 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

19 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago