शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ढोकसांगवी गावच्या हद्दीत परीटवाडी रोडवर कंटेनरने चालकाच्या बेजबाबदार पणामुळे एका दुचाकीला धडक बसुन दुचाकीस्वार खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरुन कंटेनरचे चाक गेले. त्यामुळे डोक्याला मार लागुन हनुमंत भरत गव्हाणे (वय ३८) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असुन याबाबत त्यांची पत्नी सुवर्णा हनुमंत गव्हाणे (वय ३२) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजुन १०मिनिटांच्या सुमारास ढोकसांगवी गावच्या हद्दीत अथर्व कंपनीपासुन अंदाजे २०० मिटर अंतरावर परीटवाडी रोडवर हनुमंत भरत गव्हाणे (वय ४२) सध्या रा. ढोकसांगवी, परीटवाडी ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. टाकळीहाजी ता. शिरूर जि. पुणे हे पत्नी सोबत कंपनीतुन सुटल्यानंतर दुचाकी क्रं एम एच १२ व्ही एक्स ८७१२ ही घेऊन रोडच्या कडेला थांबले होते.

 

त्यावेळी समोरुन परीटवाडी बाजुकडून अथर्व कंपनीकडे एक कंटनेर क्रं एम एच ०६ ए क्यु ०९९६ आला. या कंटेनरची ड्रायव्हर साईडने दुचाकीला धडक बसल्याने हनुमंत गव्हाणे दुचाकीवरुन खाली पडले. कंटेनरचे पाठीमागचे चाक हनुमंत गव्हाणे यांच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे डोक्याला मार लागुन ते जागीच मयत झाले. त्यामुळे कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने धडक देऊन अपघात केल्याने त्याच्याविरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती पासलकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी

रांजणगाव MIDC तील जामिल कंपनीत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर व सुपरवायझरवर गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

3 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

4 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

4 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

4 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

4 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

4 तास ago