कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC तील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जड जॉब हाताळता न आल्याने शिवबाबू कमलेश शाहू (वय २३) मुळ रा. मनकापुर, ता. मजखनपुर, जि.कोसंबी (उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाल्याने कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव दशरथ मांडे तसेच बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गादास शेंडे यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असुन सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २३ जुन २०२४ रोजी रात्री ९ च्या सुमारास मधील जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीमध्ये कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव दशरथ मांडे (रा. सासवड, व्यंकटेश स्वप्ननगरी, ता. पुरंदर जि. पुणे) तसेच बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर दुर्गाप्रसाद शेंडे सध्या (रा. रांजणगाव ता. शिरुर, जि. पुणे) यांनी कंपनीतील कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविली नाहीत. तसेच कामगार सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केला नाही.
तसेच कंपनीतील कामाची पद्धत असुरक्षित असुन कामगारांना जड जॉब हाताळण्याचे प्रशिक्षण न देता तसेच सदर ठिकाणी कुशल कामगाराची नेमणूक न करता अकुशल कामगाराकडुन कंपनीमध्ये काम करुन घेऊन निष्काळजीपणा केला. त्यामुळे शिवबाबु कमलेश शाहू (वय २३) याच्या अंगावर जड जॉब पडून त्यात तो जखमी होऊन मयत झाला. त्यामुळे कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव मांडे आणि बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर शेंडे यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीळकंठ तिडके हे पुढील अधिक तपास करत आहेत.
शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच वरातीमागुन घोड शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल
शिरुरमध्ये महिलांचे अनोखे रक्षाबंधन राखी सामाजिक प्रश्नांची अन ओवाळणी महिला सुरक्षेची