शिरूर तालुक्यात रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेसोबत लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला असुन महिला ग्राहकास रेशन दुकानदाराने पाठीमागुन मिठी मारुन तिची छेडछाड केली असुन याबाबत तक्रार दिल्यास “तुला व तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हि घटना १३ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० च्या दरम्यान करडे गावातील रेशन दुकानात घडली. तक्रारदार महिला आपल्या दोन मुलांसह रेशन घेण्यासाठी गावातील दुकानदार शिवाजी सदाशिव बांदल यांच्या दुकानात गेल्या होत्या. त्या दुकानात त्या रेशन घेत असताना शिवाजी बांदल याने त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांना मिठी मारत त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. अचानक घडलेल्या या लज्जास्पद प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन ओरडल्या. त्यावेळी आरोपीने त्यांना “तू नेहमी रेशन न्यायला येत जा, मला पैसे नाही दिले तरी चालेल ” असे अश्लील बोलून विनयभंग केला.

फिर्यादीने जेव्हा याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने “जर तु पोलिसात तक्रार केलीस तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. सदर घटना घडल्यावर त्या दिवशी महिलेला मानसिक धक्का बसल्यामुळे तिने तक्रार दाखल केली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध (लज्जास्पद वर्तन) आणि (जीवे मारण्याची धमकी) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड