क्राईम

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिक्रापूर : पत्नीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून पत्नीच्या विरहात असलेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे घडली आहे. जयेंद्र सुभाष शिंदे (वय ४५, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केल्याल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयूर रामदास शिंदे (वय ४२, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेंद्र यांची पत्नी छाया यांचे एक महिन्यापूर्वी देवदर्शनासाठी जाताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. छाया यांचे निधन झाल्याने जयेंद्र नैराश्यामध्ये होते. ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास जयेंद्र अचानक घरातून गेल्याने त्यांच्या आई व भावाने त्यांचा शोध घेतला. यावेळी त्यांना जयेंद्र याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तत्काळ जयेंद्र यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. जयेंद्र आणि त्यांची पत्नी छाया या दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण करत आहे.

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार…

खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…

रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago