मुख्य बातम्या

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…

शिक्रापूर : शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून, शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

पप्पु नामदेव गिलबिले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तात्रय बंडूपंत गिलबिले (वय 51) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय गिलबिले यांची पत्नी रोहिनी दत्तात्रय गिलबिले (वय 47, रा. हिवरे रोड, कोयाळी गावठाण, शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिनी गिलबिले व पप्पु गिलबिले हे दोघे एकमेकांच्या घराजवळ राहत आहेत. सुमारे एक वर्षापुर्वी दत्तात्रय गिलबिले यांच्यावर पप्पु गिलबिले याने त्याच्या पत्नी सोबत चॅटींग केल्याच्या संशयावरून भांडणे केली होती व त्यावरून त्यांच्याच सतत वाद होत होते. याचा पप्पु गिलबिले याच्या मनात राग होता. दरम्यान, रविवारी (ता. 1) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे घरासमोरील डिलाईट कॅफे समोर बसले होते. घराच्या बाहेर मोठा आरडा ओरडा झाला. तेव्हा रोहिनी गिलबिले यांनी बाहेर येऊन पाहिले असता, घराच्या जिन्या जवळ दत्तात्रय गिलबिले हे जखमी अवस्थेत आढळून आले. दत्तात्रय गिलबिले यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर धारधार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. यावेळी दत्तात्रय गिलबिले यांनी सांगितले की, पप्पु गिलबिले याने हत्याराने मारहाण केली आहे.

रोहिनी गिलबिले यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी दत्तात्रय गिलबिले यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालायात नेले. परंतु, दत्तात्रय गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी दत्तात्रय गिलबिले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. आरोपी पप्पु गिलबिले याने त्याच्या पत्नीसोबत दत्तात्रय गिलबिले यांनी चॅटींग केल्याच्या संशयावरून ठार मारले आहे, अशी तक्रार रोहिनी गिलबिले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर होते. पोलिसांच्या पथकाने आरोपी पप्पु गिलबिले याचा शोध घेऊन अवघ्या बारा तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मस्कर करीत आहेत.

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

शिरूर पोलिसांनी २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीला केले गजाआड…

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

बापरे! शिरूर शहरात तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

19 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

2 दिवस ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

2 दिवस ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

2 दिवस ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago