मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिरूर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. शिरूर तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका जाहिर झाल्या आहेत.

आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका…
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, शिरूर ग्रामीण, वाजेवाडी, रांजणगाव सांडस, सरदवाडी, अण्णापूर, तर्डोबाचीवाडी व कर्डेलवाडी या आठ ग्रामपंचातींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सर्व ग्रामपंचायतींची सरपंच निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे.

आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका…
शिरूर तालुक्यातील कारेगाव, पिंपरी दुमाला, खैरेवाडी, वाडा पुनर्वसन, काठापूर खुर्द, आपटी, सणसवाडी व कवठे येमाई या आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका होणार आहेत.

मतदान आणि मतमोजणी…
दरम्यान, १६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने निवडणूकीला सुरवात होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहिर होणार आहे.

ग्रामपंतायती व सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणेः
रांजणगाव गणपती – अनुसूचित जाती महिला
शिरूर ग्रामीण – अनुसूचित जमाती महिला
वाजेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
रांजणगाव सांडस – सर्वसाधारण महिला
सरदवाडी – अनुसूचित जाती महिला
अण्णापूर – अनुसूचित जमाती महिला
तर्डोबाचीवाडी – सर्वसाधारण
कर्डेलवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

 

निवडणुकीच्या बातम्या संदर्भात खालील नंबरवर संपर्क करा

तेजस फडके

9766117755

9423020103

 

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर; थेट जनतेतून…

आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

सविंदणे गावच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ 

शिरुर तालुक्यात त्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याला दणका

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचपदी सविता करपे बिनविरोध

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

1 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago