indorikar-maharaj
अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्तीनाथ इंदोरीकर महाराज यांच्या घराच्या पटांगणामध्ये बिबट्याने प्रवेश केला आणि एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
इंदोरीकर महाराज यांचे संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर आहे. या घरात चक्क बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे. बिबट्याने तिथे झोपलेले एक कुत्रं देखील उचलून नेले आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, इंदोरीकर महाराज यांच्या घराच्या पडवीमध्ये दोन कुत्रे झोपलेले आहेत. तेवढ्यात तिथे बिबट्या येतो, त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जातो. दुसरा कुत्रा बिबट्याच्या पाठीमागे लागतो. परंतु, बिबट्या कुत्र्याला घेऊन पळून गेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत. या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
टाकळी भीमात इंदोरीकरांनी घेतले युट्युब चॅनेलवाल्यांना फैलावर
बापरे! शिरूर तालुक्यात बिबट्याची थेट शाळेच्या क्रीडांगणावरच एन्ट्री…
शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…